काळे धंदे समीक्षा: महेश मांजरेकर, नेहा खानच्या हास्यजत्रेत कथानकाचे ट्विस्ट धुमाकूळ घालते

ZEE5 ओरिजनल मराठी वेब सीरीजमध्ये महेश मांजरेकर, शुभंकर तावडे आणि नेहा खान मुख्य भूमिकेत आहेत. सीरीजची समीक्षा वाचा.

A Still From Kaale Dhande

ZEE5 ओरिजनलची काळे धंदे ह्या मराठी वेब सीरीजमध्ये विनोद, नाट्य, प्रणयवाद आणि शोकांतिका असे सर्व घटक आहेत. या मालिकेत महेश मांजरेकर, नेहा खान आणि शुभंकर तावडे मुख्य भूमिकेत आहेत. ह्या सीरीजमध्ये विकी (शुभंकर) या नवोदित छायाचित्रकारची कहाणी आहे; हा विकी एका अवघड परिस्थितीमुळे आपसूकच असाह्य परिस्थितीत अडकत जातो. सीरीज अगदी सुरुवातीलाच बोल्ड, धैर्यवान आणि आनंदमय वातावरणचा सूर सेट करते. विकी बाथरूममध्ये फोनवर प्रौढ कन्टेन्ट पाहत आहे. त्याने हेडफोन घातल्यामुळे, आईवडील आणि आजी त्याला लिव्हिंग रूममधून हाका मारीत आहेत, ते त्याला काही ऐकू जात नाही.

मालिकेचा ट्रेलर येथे पहा.

विक्की प्रौढ कंटेंट बघण्यात पार बुडून गेला आहे. त्यादरम्यान, विकी आपल्या हाकांना उत्तर का देत नाहीये म्हणून त्याच्या परिवारातील सदस्य अस्वस्थ होतात, घाबरू लागतात. आता हि बातमी संपूर्ण इमारतीत पसरते की “विकी बाबा” बाथरूमचा दरवाजा उघडत नाहीये. कट टू, जेव्हा विकी बाथरूम मधून बाहेर पडतो तेव्हा तो जमलेल्या लोकांचे चेहरे बघून पार गोंधळून जातो; आणि अश्यात चुकून त्याच्याकडून हेडफोन अनप्लग होतो आणि प्रौढ क्लिप त्याच्या मोबाईलवर सुरु होते. आता मात्र त्या कंटेंटचा आवाज मात्र सर्वांना ऐकू येतो. इथून हास्य जत्रेला सुरुवात होते. शुभंकरला विकीच्या भूमिकेत पाहताना, जो विकी मुलींसाठी वेडा आहे, त्याला बघताना खूप धमाल येते. अभिनेत्याने तगडा परफॉर्मन्स देऊन सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले आहे. त्याच्या मैत्रिणीची स्वप्नालीची भूमिका नेहाने केली आहे, जिचं विनोद साधण्याचे टाईमिंग अफलातून आहे. जोपर्यंत ती आपलं तोंड उघडत नाही तोपर्यंत स्वप्नाली मादक आणि अत्याधुनिक भासते.

काळे धांडे यांचे एक स्टिल
Source: Instagram

तिचा केकाटणारा आवाज आणि तिच्या हीन दर्जाचे विनोद करण्याचा सवयीने विक्की पार गांगरून जातो. आता ह्या जोडप्यांचे समुद्र किनाऱ्यावर लिप-लॉक सुरु आहे. आणि इथूनच कथानकाला सुरुवात होते. विकीचा कौटुंबिक मित्र बबन (निखिल रत्नपारखी) त्याला त्या ठिकाणी स्पॉट करतो आणि जाऊन विकीच्या पालकांना त्याने डोळ्यांनी काय पहिले याची तपशीलवार माहिती देतो. बिथरलेला विकी त्याच्यावर सूड उगवण्यासाठी एक योजना आखतो. प्रसंगांची एकामागोमाग एक उपद्रवी साखळीच सुरु होते आणि पुढे जाऊन ती अधिक धोकादायक बनत जाते. विकी आणि त्याचे मित्र पार अडचणीत सापडतात. आणि अश्या असाह्य वेळी विकीचा संबंध अनावधानाने एका डॉनशी होतो. हा संबंध का आणि कश्यासाठी येतो हे जाणून घेण्यासाठी वेळ न दवडता हि सीरीज पाहा.

महेश मांजरेकरांची या सीरीजमध्ये होणारी अफलातून एन्ट्री एकदम कडक आहे, अण्णा भाईची भूमिका नेहमीप्रमाणचे त्यांनी उत्तम वठवली आहे. महेश मांजरेकरांना ह्या सीरीजमध्ये पाहताना खरंच निखळ आनंद मिळतो. निखिल रत्नपारखीचे काम अप्रतिम झाले आहे. त्यांचा अभिनय बघताना हसून हसून पोटात गोळा येतो. तसेच विक्कीचे मित्र सॅम, सुदर्शन, ओंकार राऊत आणि ऋतुराज शिंदे यांनी साकारलेलया भूमिकाही उत्तम आहेत, खरेच ह्या सर्वांचे कौतुक करावे तितके कमीच.

काळे धांडे यांच्याकडून अजरामर
Source: ZEE5

धमाल मनोरंजन हवे असेल तर हि सीरीज बघण्यावाचून पर्याय नाही. ट्विस्ट, ट्विस्ट आणि ट्विस्ट ने ओतप्रोत भरलेले कथानक सीरीजला एका वेगळ्याच लेव्हलवर नेऊन ठेवते. उत्तम अभिनयाने नटलेली सोबत हास्य जत्रा आणि बरेच काही ह्या सीरीजमध्ये आहे. काळे धंदे म्हणजे मनोरंजन, मनोरंजन आणि फक्त मनोरंजन आहे.

काळे धंदेचे सर्व भाग येथे पाहा आणि अधिक अपडेटसाठी आमच्या संपर्कात रहा.

तसेच

वाचले गेलेले

Share