लग्नाची वाइफ वेडिंग ची बायको: काजोल मारियावर संतापली – प्रोमो पाहा

ती कशामुळे अस्वस्थ होत आहे? जाणून घेण्यासाठी प्रोमो पाहा!

A Still From Lagnachi Wife Weddingchi Bayko

मदन, एक खेडेगावतला मुलगा, जो आता लंडनमधील एका उद्योगपतीसाठी ड्रायव्हर म्हणून काम करतोय. मदनची कथा, 21 ऑक्टोबरपासून झी मराठीवर सुरु असलेल्या ‘लग्नाची वाइफ वेडिंगची बायको’ मालिकेतून दाखवण्यात येत आहे. हि मालिका विजय आढलकर, लीना आनंद आणि रुपाली झंकार यांच्या अभिनयाने नटली आहे. यूकेला नागरिकत्व मिळावे म्हणून मदन उद्योगपतीची मुलगी मारियाच्या प्रेमात पडल्याचे ढोंग करतो. पण जेव्हा मारिया खरोखरच त्याच्या प्रेमात पडते आणि त्याच्याशी लग्न करण्याची आपली इच्छा बोलून दाखवते तेव्हा खरी समस्या निर्माण होते. खरी मेख अशी आहे की मदन विवाहित आहे याची तिला सुतराम कल्पना मारियाला नाही.

येथे नवीनतम भाग पाहा.

एकदाचे मारियाला सत्य समजते आणि तरीही ती मदनबरोबर तडजोड करण्याचा निर्णय घेते. सध्या शोमध्ये ती मदनबरोबर भारतात आली आहे. आता त्याची पत्नी काजोलला तिचा स्वीकार करण्यास फारच कठिण जात आहे. नव्या प्रोमोमध्ये असे दिसतेय कि दोन स्त्रिया एकमेकांशी भांडत आहेत. येथे पाहा.

https://www.instગ્રામ.com/p/B34jueVnejL/?utm_source=ig_web_copy_link

आपण पाहू शकता की, काजोलने मारियासाठी काहीतरी बनविले आहे, आणि काय बनविले आहे हे तिला समजावून सांगण्याचा ती अटोकाट प्रयत्न करीत आहे. पण मारिया ते समजून घेण्यास असमर्थ आहे आणि म्हणून काजोल आपला संयम गमावते आणि तिच्यावर ओरडू लागते. आता मारियाची प्रतिक्रिया काय असेल? आणि मदन हि परिस्थिती कशी हाताळेल?

लग्नाची वाइफ वेडिंगची बायको मालिकेचे सर्व भाग पाहा फक्त ZEE5 वर.

तसेच

वाचले गेलेले

Share