लूज कंट्रोल: अक्षय म्हात्रे अभिनित लूज कंट्रोल चित्रपट पाहण्याची 5 कारणे

या चित्रपटात शशिकांत केरकर, भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आत सर्व तपशील पाहा!

A Still From Looose Control

आपल्या दैनंदिन जीवनात कधी कधी बदल घडून यावा आणि आपले थकलेले शरीर व मन प्रसन्न व्हावे असे आपल्याला वाटते असते. त्यासाठी तुम्ही करमणूक हे साधन निवडता. मग त्यात गाणी ऐकणे चित्रपट बघणे अशा गोष्टी असतात. यातीलच एक गोष्ट जर म्हणून तुम्ही आपली थकान मिटवण्यासाठी चित्रपट निवडला असेल तर, तुम्ही लूज कंट्रोल हा चित्रपट आवर्जून बघा! अक्षय म्हात्रे, शशिकांत केरकर, मनमीत पेम, भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांच्या अभिनीत चित्रपटातील तीन अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची कहाणी आहे, ज्यांना कोणत्याही परिस्थितीत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. हे करण्यासाठी, ते प्रश्नपत्रिकांच्या बदल्यात त्यांच्या महाविद्यालयीन अधिकाऱ्यांना लाच देण्यासाठी बनावट सेक्स टेप तयार करण्याचे विचित्र पाऊल उचलतात.

चित्रपटाचा ट्रेलर येथे पाहा.

आपण हा चित्रपट का पहावा याची 5 कारणे येथे आहेत.

1. प्लॉट

चित्रपटाची कथा मजेदार, मनोरंजक आणि रोमांचकारी आहे. कमी मेहनतीत यशस्वी होण्याचा मार्ग नेहमीच धोकादायक धरतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे लूज कंट्रोल हा चित्रपट आणि त्यातील ते मैत्रीचं त्रिकुट होय. ही मजेदार कथा तुम्हांला नक्की आवडेल.

2. ठळक सामग्री

अलीकडच्या काही वर्षांत मराठी सिनेमांनी कात टाकली आहे ज्यामध्ये अनेक दर्जेदार विनोदी चित्रपट सामील आहेत. त्यापैकी एक लूज कंट्रोल हा चित्रपट नक्कीच ठरु शकतो. या चित्रपटरच्या निर्मात्यांनी उत्कृष्ट कथेने या चित्रपटाची बांधणी विनोदी अंगाने मजबूत केली आहे.

3. त्रिकुट

View this post on Instagram

Amhi Tigha ❤️ #LoooseControl #incinemasnow

A post shared by Akshay Mhatre (@akshaymhatre11) on

अमोल, जग्गो आणि पिनाकची मैत्री आपल्याला आपल्या कॉलेजच्या काळाची आठवण करून देईल. या त्रिकूटात प्रत्येकजण सहजपणे आपल्या अभिनयाची छाप बघणाऱ्याच्या मनावर पडतो.

Us. कुशल आणि भाऊ यांचे कॅमिओस

चला हवा येऊ द्या या मालिकेला आपल्या विनोदी आणि अभिनय कौशल्याने जागतिक पातळीवर प्रसिद्धी देण्यामागे यांचे मोलाचे योगदान आहे. मग अशा दमदार विनोदी अभिनेत्यांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट किती विनोदी असेल याची तुम्ही कल्पनाही करु शकत नाही.

5. करमणूक, करमणूक, करमणूक

लूज कंट्रोल ही रोलर कोस्टर राइड आहे. ज्यात शब्द या शब्दातून हा चित्रपट अधिक मनोरंजनात्मक होतो. याहून अधिक मनोरंजन कुठले असूच शकत नाही.

आपण येथे चित्रपट पाहू शकता आणि त्याबद्दलची आपली प्रतिक्रिया आम्हांला खालील टिप्पण्या विभागात खुशाल सांगू शकता! अधिक मनोरंजनासाठी, झेडई 5 वर मजेदार मराठी चित्रपटांचे संग्रह पाहा.

ZEE 5 वर मजेदार मराठी चित्रपटांचे संग्रह पाहा.

तसेच

वाचले गेलेले

Share