मराठी पार्श्वगायिका गीता माळी यांचे एका रोड अपघातात निधन

गीता माळी मुंबईहून त्यांच्या गावी नाशिकला निघाल्या होत्या.

A Still Of Geeta Mali

ठाणे जिल्ह्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर झालेल्या एका अपघातात काल मराठी पार्श्वगायिका गीता माळी यांचे निधन झाले. त्या त्यांच्या गावी नाशिकला जात होत्या. मुंबईहून नाशिकच्या दिशेने गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान जात असता, खर्डी व आसनगाव दरम्यान लाहे गावाजवळ श्वानाला वाचविण्याच्या गडबडीत समोर उभ्या असलेल्या गॅसच्या टँकरला त्यांच्या गाडीने जोरदार धडक दिल्याने गीता यांचा जागीच मृत्यू झाला व त्यांचे पती चालक विजय माळी हे गंभीर जखमी झाले. विजय यांच्यावर शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.

गीता यांनी काही मराठी चित्रपटांसाठी गाणे गायले होते तसेच त्यांच्या गाण्यांचे स्वतंत्र अल्बमसुद्धा आहेत .

 

येथे न्यूड मराठी चित्रपट पहा.

 

 

शहापूरजवळील लहे फाट्याजवळ दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला. त्यांना व त्यांच्या मिस्टरांना दोघांनाही गंभीर दुखापत झाली होती आणि त्यांना तातडीने शाहपूर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु गीता यांचे उपचारादरम्यान निधन झाले.

 

 

आम्ही त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना करतो.

 

आपणास मराठी चित्रपट पाहायचे असल्यास ZEE5 वरील संग्रह पहा.

तसेच

वाचले गेलेले

Share